२०१९ मध्ये माेठ्या प्रमाणात वाढलेली गुन्हेगारी २०२० मध्ये काेराेना संसर्ग झाल्याने कशी कमी हाेत गेली हे पाेलीस असलेल्या दप्तरी नाेंदवरून दिसून येते. चाेरीच्या घटनावगळता खून, जीवे मारण्याचा प्रयत्न या घटनेमध्ये माेठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. काेराेनामुळे कधी लाॅकडाऊन तर कधी कडक निर्बंधामुळे गुन्हेगारी वृत्तीचे नागरिकही घरातच राहिल्याने या घटनेत घट झाल्याचे बाेलल्या जाते. सन २०१९ च्या तुलनेत २०२० पासून काेराेना संसर्गामध्ये गुन्हेगारीत कमालीची घट झाली आहे.
..............
काेराेना संसर्गामुळे लाॅकडाऊन, कडक निर्बंधामुळे लाेकांची मानसिक स्थिती बदलली आहे. या प्रकारातून काहीजण गुन्हेगारीकडे वळल्याची शक्यता नाकारता येत नाही.
डाॅ. नरेश इंगळे
मानसोपचार तज्ज्ञ
काेराेना संसर्गांची भीती सर्वच स्तरांत हाेती. त्यामधून गुन्हेगारी प्रवृतीचे लाेकही सुटले नाहीत. काेराेनापासून बचाव व्हावा याकरिता असे व्यक्तीही सावध हाेत्या. त्यामुळेही गुन्हेगारीच्या घटना कमी झाल्यात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही
- शिवाजी ठाकरे, पाेलीस निरीक्षक