यावेळी पंचायत समिती आवारात असलेल्या हुतात्मा स्तंभाजवळ वीरचक्र अर्पण करून कारगिल दिन वीर मरण प्राप्त झालेल्या सैनिकांना अभिवादन करण्यात आले. २६ जुलै रोजी कारगिल दिन साजरा करते वेळी रिसोड पंचायत समिती सभापती सुभाष खरात, पंचायत समिती माजी उपसभापती प्रल्हाद सोनुने, माजी सैनिक नारायणराव सानप, अर्जुनराव खानझोडे, अध्यक्ष माजी सैनिक संघटना रिसोड प्रकाश लाटे, नामदेवराव पाचरणे, तेजराव धामोडे, शंकर पवार, देवानंद वाघ, हरिगीर गिरी, सुरेशराव शेंडे, राहुल पवार, गजानन गवई, निंबाजी आरू यांच्यासहित मोठ्या प्रमाणात माजी सैनिकांची उपस्थिती होती. यावेळी पंचायत समिती सभापती सुभाष खरात यांनी कारगिल दिनाचे महत्त्व पटवून शहीद झालेल्या जवानांच्या आठवणीला उजाळा दिला. पाकिस्तान सीमेवर प्रत्यक्ष १९७१ यावर्षी लढाई करणारे माजी सैनिक नारायणगाव सानप यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
रिसोड पंचायत समितीत कारगिल दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:43 AM