याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग असलेले भारतीय माजी सैनिक संघटना, वाशिमचे अध्यक्ष कॅप्टन साईदास वानखेडे, कॅप्टन सुखदेव नानोटे, सैनिक फेडरेशनचे जिल्हा प्रवक्ता सुभेदार दीपक ढोले, सैनिक फेडरेशनचे जिल्हा सचिव ना. सुभेदार शंकरराव वडकर, तसेच ज्येष्ठ प्रल्हाद आरू यांच्याहस्ते पुष्प-मालार्पण, पूजन व आदरांजली वाहून सर्व सैनिकांनी कारगिल युद्धातील आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक व संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी दीपक ढोले यांनी सैनिकांवरील कविता ऐकवून केले. तसेच फेडरेशनचे राज्याध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या नेतृत्वाखाली फेडरेशन राज्यभर आजी व माजी सैनिकांविषयी करीत असलेल्या कार्याविषयी माहितीही दिली. या कार्यक्रमात बांडे कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. पंकजकुमार बांडे यांनीही सैनिकांच्या कर्तृत्वाविषयी मनोगत व्यक्त केले.. कार्यक्रमास भावेष उगले, शरद सरनाईक, पुरुषोत्तम ठोंबरे, भाऊराव लहाने, विजय माने, बालाजी सदार, एफ. आर पठाण, धनराज कांबळे तसेच जिल्ह्यातील आजी-माजी सैनिक विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव शंकरराव वडकर, कॅप्टन अतुल एकघरे, खाडे, अनिल सुर्वे व फेडरेशनचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना सैनिकांच्या समस्यांसंदर्भातील निवेदन देण्यात आले.
कारगिल विजय दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:43 AM