शहरं
Join us  
Trending Stories
1
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास विक्रमाला घातली गवसणी
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
5
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
6
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
7
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
8
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
9
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
10
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
11
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
12
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
13
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
14
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
16
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
17
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
18
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
19
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
20
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले

वाशिमचे कावडधारी युवक, वडदच्या गावकऱ्यांमध्ये संघर्ष; पोलिसांची सतर्कता

By सुनील काकडे | Published: September 09, 2023 8:23 PM

कावडधाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविले

वाशिम : औंढा नागनाथ (जि.हिंगोली) येथे जल आणण्यासाठी गेलेले वाशिम शहरातील कावडधारी युवक परतीच्या मार्गावर असताना कनेरगावपासून ८ किलोमिटर अंतरावरील वडद फाट्यानजिक असलेल्या ढाबा मालकासोबत त्यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी वडद गावातील सुमारे १५० ग्रामस्थ व कावडधाऱ्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. पोलिसांनी सतर्कता दाखवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना शनिवार, ९ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, वाशिम शहरातील २० ते २२ कावडी औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ येथून जल आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी गेल्या होत्या. ९ सप्टेंबर रोजी त्या परतीच्या मार्गावर असताना दुपारी १.३० वाजेच्या सुमारास वडद फाटा येथे आल्यानंतर कावडीतील काही युवक व ढाबा मालक सचिन पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वादाला तोंड फुटले. शाब्दीक चकमकीनंतर वाद वाढत गेला. ही वार्ता पसरताच काहीच क्षणात गावातून ट्रॅक्टरमध्ये सुमारे १५० जण ढाब्यासमोर येऊन थांबले. तसेच ट्रॅक्टर आडवा करून येणाऱ्या कावडींना अडविणे सुरू करण्यात आल्याने गावकरी व कावडधारी युवकांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली.

घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक अशोक कांबळे, जमादार आकास पंडीतकर, शंकर जाधव यांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर घटनास्थळाहून कावडींना पुढे मार्गस्थ करण्यात आले. तसेच वडद येथील गावकऱ्यांची समजूत काढून त्यांनाही गावाकडे परत पाठविण्यात आले. या घटनेतील जखमी सचिन पाटील यांना उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.वडद फाटा (जि.हिंगोली) येथे घडलेल्या घटनेची माहिती प्राप्त झाली असून आम्ही परिस्थितीवर पूर्णत: नियंत्रण ठेवून आहोत. वाशिम शहरातील कावडधारी युवकांना वाशिम ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजगाव येथे हलविण्यात आले आहे.- प्रमोद इंगळे, ठाणेदार, वाशिम ग्रामीण पो.स्टे.