जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे. फेब्रुवारीअखेर कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा ८ हजार ९३४ होता. मात्र त्यानंतर सातत्याने रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढच होत गेली. २० मेअखेर हा आकडा ३७ हजार २७७ वर पोहोचला आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत अर्थात २५ फेब्रुवारी २०२१ पूर्वी ३० अधिकारी आणि २९९ अंमलदार अशा एकूण ३२९ जण कोरोना बाधित झाले होते. त्यापैकी एका अंमलदाराचा मृत्यू झाला; तर १५ फेब्रुवारी ते १९ मे २०२१ या कालावधीत १४ अधिकारी आणि २०६ अंमलदार अशा एकंदरीत २२० जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील १२ जणांवर सध्या उपचार सुरू असून, २०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसऱ्या लाटेत कुणाचाही सुदैवाने मृत्यू झाला नाही.
....................
पहिली लाट
एकूण रुग्ण - ७,३३९
पोलीस - ३२९
एकूण मृत्यू - १५६
पोलीस मृत्यू - ०१
.............................
दुसरी लाट
एकूण रुग्ण - २९,९३८
पोलीस - २२०
एकूण मृत्यू - २२८
पोलीस मृत्यू - ००
............................
बाॅक्स :
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन व्यायाम, प्राणायाम
पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना सदैव ‘फीट ॲण्ड फाईन’ राहावे लागते. ही जाणीव ठेवून कोरोनाची बाधा होऊनही त्यातून अनेक अधिकारी, कर्मचारी अल्पावधीतच सुरक्षितरीत्या बाहेरही आले. दैनंदिन व्यायाम, प्राणायाम, फळांच्या ज्यूसचे प्राशन करण्याचा फायदा झाल्याचे काहींनी सांगितले.
.....................
कोट :
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने संपूर्ण जिल्ह्याला आपल्या कवेत घेतले आहे. समाजाचाच एक भाग असलेले पोलीस तरी त्यातून कसे सुटणार? वर्षभरात ५४० अधिकारी व अंमलदार कोरोना बाधित झाले; मात्र आज रोजी ५२७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
- श्रीराम घुगे
निरीक्षक, डीएसबी ब्रँच
............
सकाळ-सायंकाळच्या सुमारास मैदानावर हजर राहून शारीरिक कसरती करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची बाधा झाली, मात्र त्यातून ते यशस्वीरीत्या बाहेरही पडले. सततच्या व्यायामामुळे त्यांच्यावर जीवघेणे संकट ओढवले नाही, ही बाब दिलासा देणारी ठरली.
- शिवाजी ठाकरे
निरीक्षक, एलसीबी ब्रँच
..............
वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चोख अंमलबजावणी केली जात आहे. यादरम्यान पहिल्या लाटेत ३२९ व दुसऱ्या लाटेत २२० अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील एकाचा मृत्यूही झाला. इतर जवानांनी मात्र यशस्वीरीत्या कोरोनावर मात केली आहे.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम