वाशिम: तालुक्यातील खंडाळा खुर्द प्रकल्पात पाणी साठा असतानाही केवळ प्रशासनाच्या दिरंगाईमुळे जवळ पास २00 शेतकर्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने ३ डिसेंबरला प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत जलसंपदा विभागाने शेतकर्यांना बोलावून पाणी सोडणार असल्याचे स्पष्ट केले. तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील प्रकल्प यावर्षी ९५ टक्के भरला होता. सद्य:स्थितीत या प्रकल्पात ५४ टक्के पाणी आहे. या प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर अडोळी व खंडाळा शिवारातील जवळपास २00 शेतकर्यांचा सिंचनाचा प्रश्न निगडित आहे. गतवर्षीदेखील हा प्रकल्प ९0 टक्क्याच्या वर पाण्याने तुडुंब भरला होता; मात्र सिंचनासाठी पाणी सोडण्याला परवानगी दिली नाही. यावर्षी सद्य:स्थितीत या प्रकल्पात ५३ टक्के पाणी असल्याने शेतकर्यांच्या सिंचनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र कालव्याद्वारे पाणी सोडण्यात संबंधित विभागाचे अधिकारी दिरंगाई करीत असल्याचा आरोप अडोळी येथील नामदेव इढोळे, नारायण इढोळे आदी शे तकर्यांनी केला होता. खंडाळा खुर्द प्रकल्पातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याबाबत अडोळी ग्रामसभेने यापूर्वी ठराव पारित केला; मात्र तरीही पाटबंधारे विभाग या प्रकल्पातून पाणी सोडण्यास टाळाटाळ करीत होते. याबाबत 'लोकमत'ने सविस्तर वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी शेतकर्यांना चर्चेसाठी बोलाविली. आठवडाभरात पाणी सोडले जाईल, असे आश्वासन दिल्याचे नामदेव इढोळे या शेतकर्यांनी सांगि तले.
खंडाळा प्रकल्पातून पाणी सुटणार!
By admin | Published: December 08, 2015 2:25 AM