सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटणी होते.
प्रास्ताविक प्रभारी तालुका कृषी अधिकारी संतोष चौधरी यांनी केले. बियाण्यांची गरज व उपलब्धता तसेच रासायनिक खतांची गरज उपलब्धता याविषयी सविस्तर माहिती सादर केली. कृषी विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून पेरणी करीता लागणारे बियाणे घरचेच वापरावे या विषयी आग्रह केला. आमदार राजेंद्र पाटणी यांनी पोकरा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अधिक लाभ कसा मिळवून देता येईल, तसेच शेतकऱ्यांनी कृषितज्ज्ञ सांगतात याप्रमाणे सोयाबीन बियाणे न विकण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. कृषी पर्यवेक्षक गुणवंत ढोकणे यांनी सोयाबीन बियाणे शास्त्रोक्त पद्धतीने कसे तपासावे, साठवावे या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
आढावा सभेकरिता पंचायत समिती कारंजाच्या सभापती रवीता.............. विश्वनाथ रोकडे, प्रगतिशील शेतकरी डॉ. राजीव काळे, सरपंच जयपूर विजय काळे, जिल्हा परिषद सदस्य आशीष दहातोंडे, वनिता खरे, चंद्रशेखर डोईफोडे, सुनीता नाखले व इतर सदस्य हजर होते.
तसेच पंचायत समिती सदस्य मयूर मस्के, वर्षा गवई, अलका अंबरकर, शुभम बोनके, मोनाली तायडे, मैनोद्दीन सौदागर, विशाल घोडे, प्रदीप देशमुख, रंगराव धुर्वे, वैशाली काळे, देवानंद देवडे हे हजर होते. कार्यक्रमाकरीता कृषी अधिकारी पंचायत समिती कारंजा पुंडलिक देशमुख व चमूने प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळ कृषी अधिकारी अतुल क्षीरसागर यांनी केले.