शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 4:18 AM

यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री ॲड. किरणराव सरनाईक, लखन मलिक, अमित ...

यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. शाम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री ॲड. किरणराव सरनाईक, लखन मलिक, अमित झनक, जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा उपनिबंधक मैत्रवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई पुढे म्हणाले, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेण्यात येते. यावर्षी सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे सरसकट सोयाबीन शेतकऱ्यांनी न विकता, येत्या खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकरी स्वतःचे बियाणे कसे वापरतील, यासाठी कृषी विभागाने त्यांना प्रवृत्त करावे. राष्ट्रीयीकृत व सहकारी मध्यवर्ती बँकांनी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जपुरवठा करावा. जास्त दराने जिल्ह्यात खते व बियाण्यांची विक्री होणार नाही, याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे. प्रसंगी कृषी केंद्रावर गुन्हे दाखल करावेत, असे त्यांनी सांगितले.

खासदार गवळी म्हणाल्या की, जिल्ह्यात सोयाबीनला पर्यायी पिके यावर्षी लावण्यात आली पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. आ. झनक म्हणाले की, यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली आहे. उन्हाळी सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांशी कृषी विभागाने संपर्क साधून आगामी खरीप हंगामासाठी सोयाबीन पेरणीसाठी ते बियाणे कसे उपयोगात आणता येईल, यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांनी खरीप हंगाम आढावाबाबत माहिती देताना सांगितले की, चालू वर्षी ४ लाख ६ हजार ४५० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन आहे. तालुक्याच्या बैठका लोकप्रतिनिधी व प्रगतशील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या आहेत. या बैठकीला संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कृषी विभागाने बीजप्रक्रिया, उगवण क्षमता तपासणी, पेरणी, रासायनिक खतांचा वापर याविषयी माहिती देणारी भिंतीपत्रिका तयार केली असून, या भिंतीपत्रिकेचे विमोचन पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.