वाशिम: सन २०१७-१८ मधील खरीप हगामाकरिता जिल्ह्याची नजर अंदाज (हंगामी) पैसेवारी जाहीर झाली असून जिल्ह्यातील प्रमुख पिकांची सरासरी पैसेवारी ५८ पैसे इतकी निघाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रविवारी कळविण्यात आले आहे.
वाशिम तालुक्यातील १३१ गावांची नजर अंदाज पैसेवारी ५५ पैसे, मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची नजर अंदाज पैसेवारी ६० पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची नजर अंदाज पैसेवारी ६८ पैसे, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची नजर अंदाज पैसेवारी ५८ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची नजर अंदाज पैसेवारी ५५ पैसे व मानोरा तालुक्यातील १३६ गावांची नजर अंदाज पैसेवारी ५४ पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच ७९३ महसुली गावांची नजर अंदाज पैसेवारी ही ५० पैसेपेक्षा अधिक असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.