कारंजा लाड (जि. वाशिम): कारंजा तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या निवडणुकीसाठी २ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पयर्ंत या वेळेत शांततेत मतदान पार पडले. या निवडणुकीत ३ हजार ९५५ पैकी १८३९ मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी ४६.५ आहे. कारंजा तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या १५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत दोन्ही गटाकडून प्रत्येकी १५ उमेदवार उभे करण्यात आल्याने दोन गटांत सरळ लढत झाली. या निवडणुकीची संपूर्ण तयारी सहायक निबंधक कार्यालयाकडून शनिवारीच करण्यात आली होती. आज (दि.२) रोजी सकाळी ८ वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सायंकाळी ४ वाजे पयर्ंत कारंजा शहरातील मुलजी जेठा नगर परिषद हिंदी शाळा क्रमांक १ मध्ये ७२१ पैकी ३२९, केंद्र क्रमांक २ मध्ये ७३0 पैकी ३२४ व , उंबडाबार्जार जि.प.शाळा केंद्र क्रमांक ३ मध्ये ७७५ पैकी ३८६, कामरगाव जिल्हा परिषद शाळा केंद्र क्रमांक ४ मध्ये ६२0 पैकी २७५ तर धनज बु. जि.प.शाळा केंद्र क्रमांक ५ मध्ये १0९५ पैकी ५२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी. जी. जाधव यांनी कर्तव्य बजावले. निवडणूक केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निवडणुकीची मतमोजणी सोमवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पासून येथील कृषि उत्पन्न बाजार समि तीच्या यार्ड क्रमांक एक मधील कृषक भवन येथे होणार आहे.
खविसं निवडणुक; ४६ टक्के मतदान
By admin | Published: August 03, 2015 12:59 AM