अकोला - किडनी तस्करी प्रकरणातील दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत प्रथम श्रेणी न्यायालयाने मंगळवारी ११ डिसेंबरपर्यंतची वाढ केली. अकोल्यातील हरीहर पेठेतील रहिवासी आनंद जाधव याने देवेंद्र शिरसाट याच्या मदतीने अवैध सावकारीतून पाच जणांच्या किडनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. या दोघांच्या जबाबात सांगली जिल्ह्यातील शिवाजी महादेव कोळी नामक शिक्षकाचे नाव समोर आले. कोळीच्या मध्यस्थीतून अकोल्यातील पाच लोकांच्या किडन्या लाखो रुपयांमध्ये विकल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक केली. यामध्ये किडनी तस्करांचा सुत्रधार शिवाजी कोळी, देवेंद्र शिरसाट, आनंद जाधव व विनोद पवार या चौघांचा समोवश आहे. शिरसाट व जाधव या दोघांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. हुसेन यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत ११ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. विनोद पवार याच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या, बुधवारी संपणार आहे. सुत्रधार शिवाजी कोळी हा १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहे. न्यायालयात स्थानिक गुन्हे शाखा प्रमूख जितेंद्र सोनवने यांनी आरोपींच्या कोठडीची मागणी केली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अँड. जी.एल.इंगोले यांनी कामकाज पाहीले. देवेंद्र शिरसाटच्या पत्नीचे कोरे धनादेश जप्त हरीहरपेठेतील रहिवासी, या प्रकरणातील पहीला आरोपी देवेंद्र शिरसाट याच्या पत्नीच्या नावाचे कोरे धनादेश पोलिसांनी जप्त केले आहेत. ते कुणी व कशासाठी दिले याचा शोध पोलीस घेणार आहेत. या कोर्या धनादेशांवर स्वाक्षरी असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
किडनी तस्करांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
By admin | Published: December 09, 2015 2:55 AM