निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील ग्राम सोनखास ते तामसी व तामसी ते अकोला दरम्यानचा रस्ता ठिकठिकाणी खराब झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब झाल्याने या गावातील गावकऱ्याचा जिल्ह्याच्या ठिकाणचा संपर्क तुटला आहे. हा रस्ता ठिकठिकाणी उखडल्या गेला असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून परिसरातील गावातून मोठ्या संख्येने बाजारहाट तसेच इतर कामासाठी ग्रामस्थ वाशिमला येतात. मात्र हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त न करण्यात आल्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खड्ड्यात पाणी साचून वाहनधारकांना अंदाज येत नसल्यामुळे दुचाकी तसेच चारचाकी वाहनांचे अपघात होत आहेत. गावकऱ्यांना होत असलेला हा त्रास पाहता या रस्त्यावरील खड्डे तातडीने दुरुस्त करून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. अन्यथा मनसेकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
सोनखास, तामसी ते अकोला रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:48 AM