वाशिम : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद थेट विधिमंडळासह राज्याच्या विविध भागात उमटले आहेत. वाशिम येथेही शिवसेना (उद्धव ठाकरे) व युवासेनेच्यावतीने स्थानिक पाटणी चौकात किरीट सोमय्याच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले तसेच सोमय्याचे बॅनर जाळून निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाटणी चौक येथे कथित व्हायरल व्हिडीओचे पोस्टर दाखुवन निषेध केला. वेळीच अटक करून गुन्हे दाखल करण्याची मागणीही शिवसैनिकांनी केली. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जि.प. अर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी, उपजिल्हाप्रमुख माणिक देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख नितीन मडके, रामदास मते पाटील, गजानन भांदुर्गे, राजाभैया पवार, गजानन ठेंगडे, गजानन जेताडे, राजेश बोडके, कॅप्टन प्रशांत सुर्वे, महीला आघाडीच्या जयश्री देशमुख, ज्योती खोडे, सुनीता गव्हाणकर, रंजना पारसकर, सुधाताई नप्ते यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, तालुका व शहर शाखेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.