लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : काेराेना संसर्गामुळे अनेक क्षेत्रातील घडामाेडींसाेबतच घराघरातील किचनमध्येही बदल झाल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीवरून दिसून येत आहे. पूर्वी फास्टफूड, तेलकट पदार्थांना पसंती देणारे नागरिक, महिला प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या पदार्थांना पसंती देत असल्याने घराघरातील किचनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे दिसून आले.शहरातील काही गृहिणींशी चर्चा केली असता त्यांच्या चर्चेतून कुटुंबात बनविण्यात येणाऱ्या फास्टफूडला नाकारून प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्याए पाेषक तत्त्व असणाऱ्या भाज्या, फळे, कडधान्यांचा वापर वाढलेला असल्याचे दिसून येत आहे. ताक, साबुत धान्य, फळे, पालेभाज्यांचे प्रमाण सद्यस्थितीत स्वयंपाकगृहात वाढलेले दिसून येत आहेत.
प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी घरात आता कच्च्या भाज्या, कडधान्यांचा वापर वाढला प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी घरातील किचनमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले असून आता कच्च्या भाज्या, कडधान्ये, सॅलेडवर घराेघरी भर देण्यात येत आहे. तसेच फळेही मोठ्या प्रमाणात आणली जात आहेत.जिरे, कोथिंबीर आणि हळद यासारख्या मसाल्यांचा जेवणात समावेश वाढला. वाळलेले आले आणि लसूण देखील अन्नामध्ये समाविष्ट करण्यात येत असून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळा खाल्ला जाताेय. चिकन आणि कोल्ड वॉटर फिश, हिरव्या भाज्या आणि छोले सारखे पदार्थ व्हिटॅमिनने समृध्द असल्याने त्यांचा वापर वाढला आहे.
काेरानामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, च्यवनप्राश दिवसातून दोनदा रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत तसेच हळदीचे दूध पिणे यावर आमचे कुटुंब भर देत आहेत. तसेच भाज्यांचा वापरमध्ये बदल झाला आहे.- उज्वला खानझाेडेवाशिम