वाशिम : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९०वी जयंती स्थानिक दिव्यरत्न प्रज्ञालंकार जनहित बहुउद्देशीय संस्थेकडून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक आशादेवी खडसे, तर प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्ती कांबळे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, ‘क्रांतिबा फुले’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. यामध्ये वाशिम शहरातील नाट्यकलावंत अरविंद उचित यांनी जोतिबा फुले व हंसिनी उचित यांनी सावित्रीबाई फुलेंच्या भूमिका साकारून सावित्री जोतिबांच्या जीवनातील काही प्रसंग आपल्या अभिनयातून सादर करताना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाला लताबाई सोनुने, तनुश्री वैद्य, पूजा भगत, उषा गवई ,सर्वांष उचित यांची उपस्थिती होती.
-------------
शिवाजी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय मोप
रिसोड : तालुक्यातील मोप येथील शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम विद्यालयातील महिला शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हारार्पण करून पूजन केले. यावेळी शिक्षिका रेखा करंगे, प्रियंका हजारे, जया चारथळ यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य गजानन मुलंगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण खरडे, सचिन देशमुख, शंतनू मोरे, भागवत नरवाडे आदींनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन सिद्धी सिकची, कोमल नरवाडे यांनी, तर आभार प्रदर्शन प्रियंका मोरे हिने केले.
-----
संत तुकाराम महाराज विद्यालय कंकरवाडी
रिसोड : येथून जवळच असलेल्या कंकरवाडी येथील संत तुकाराम महाराज विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्त्रीमुक्ती दिन तसेच महिला शिक्षण दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य साहेबराव जाधव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सायली मोरे, विशाखा शेजूळ, सुनीता शिंदे, प्रेरणा जायभाये, विजय कांबळे, धम्मापाल शेजूळ, निकिता कांगणे, संजना महामुने या विद्यार्थिनींसह शिक्षक बद्रीनारायण फड, रेखा चाटसे, गजानन सानप, मदन खानझोडे यांची उपस्थिती होती. यात प्राचार्य साहेबराव जाधव यांनी शिक्षिका रेखा चाटसे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन सानप, तर आभारप्रदर्शन मदन खानझोडे यांनी केले. शाळेचे शिपाई तुळशीराम जाधव यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे परिश्रम घेतले.