लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व मजुरांची मजूरी १ एप्रिल २०१७ पासून त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात "आॅनलाईन" जमा केली जात आहे. मात्र, ज्या मजूरांनी अद्याप खाते सुरू केले नाही, त्यांची परवड होत असल्याचे दिसून येत आहे.विद्यमान शासनाकडून सर्वच प्रकारची कामे, योजना ह्यआॅनलाईनह्ण करून पारदर्शी व्यवहार ठेवण्याचे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असणाऱ्या कामांवरील मजूरांची मजूरी देखील थेट बँकेत ह्यआॅनलाईनह्ण जमा केली जात आहे. त्यानुसार नोंदणीकृत मजूरांनी आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून घेण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले. तरीदेखील सुमारे १० ते १२ हजार मजूरांचे खाते अद्याप बँकेत सुरू झाले नाही. त्यामुळे त्यांची मजूरी बँकेत जमा करणे अवघड हात आहे. तथापि, जे मजूर अद्याप बँकेत खाते सुरू करू शकले नाहीत अथवा ज्या मजूरांनी आपले आधार क्रमांक बँक खात्यांशी संलग्नित केले नाही, त्यांनी रोजगार हमी योजना कार्यालयाशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन रोजगार हमी योजना विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी केले आहे.
बँकेत खाते नसणा-या मजूरांची होतेय परवड!
By admin | Published: May 19, 2017 7:34 PM