लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) मजुरांची मजुरीची रक्कम अदा करण्यास प्रचंड विलंब होत आहे. हा मुद्दा विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या आढावा बैठकीतूनही निदर्शनात आला. विलंब करणाºयांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शुक्रवारी दिला.बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळावा तसेच विकासात्मक कामांना चालना मिळावी म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामे केली जातात. वाशिम जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात. सदर काम झाल्यानंतर मजुरांना मजुरी मिळणे अपेक्षित आहे; मात्र, मजुरी अदा करण्यात प्रचंड विलंब होतो. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे मजुरांनी तक्रारीदेखील केलेल्या आहेत. हा मुद्दा विभागीय आयुक्त सिंह यांच्या आढावा बैठकीत उपस्थित झाल्यानंतर आयुक्तांनी संबंधिताना यासंदर्भात जाब विचारला. विलंब होत असेल तर याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना दिल्या. मजुरीची रक्कम अदा करण्यास विलंब करणाºया कर्मचाºयांना दंड करून त्याची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरु आहे. यापुढे मस्टर पेंडिंग ठेवणाºया गट विकास अधिकाºयांवरही दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिला. आॅगस्ट महिन्यापासून कार्यवाही होईल.
मजुरी अदा करण्यास विलंब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 2:34 AM
विलंब करणा-यांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शुक्रवारी दिला.
ठळक मुद्देमनरेगा अंतर्गत मजुरीची रक्कम अदा करण्यास प्रचंड विलंबविभागीय आयुक्तांनी दिले दंडात्मक कारवाईचे संकेत