वाशिम: जिल्ह्यातील विविध विभागांत कार्यरत अधिकाऱ्यांसाठी मुख्यालयाच्या ठिकाणी निवासस्थानाचा अभाव आहे. शासकीय निवासस्थान नसल्याने काही अधिकारी भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहेत. तर काहींना मात्र अगदी परजिल्ह्यातूनही अपडाऊन करावे लागत आहे. वाशिम जिह्याची निर्मिती २० वर्षांपूर्वी झाल्यानंतर या ठिकाणी बहुतांश जिल्हा मुख्यालयांची स्थापना करण्यात आली. तथापि, या मुख्यालयात पदस्थापनेनंतर रुजू झालेल्या काही अधिकाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने मात्र उभारण्यात आली नाहीत. परिणामी काही अधिकाऱ्यांना भाड्याच्या घरांत वास्तव्य करावे लागत आहे. प्रत्यक्षात या अधिकाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळत असला तरी, त्यांना त्यापेक्षा अधिक रक्कम घरभाड्यापोटी द्यावी लागत आहे. विविध तालुकास्तरावरही हीच स्थिती असून, काही बडे अधिकारी या कारणामुळे परजिल्ह्यातून अपडाऊन करीत आहेत. अधिकारी आपले कर्तव्य बजावण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असले तरी, काही वेळा वाहतुकीचा खोळंबा आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे कार्यालयात वेळेवर दाखल होण्यास विलंब लागतो. तालुकास्तरावरील काही अधिकाऱ्यांना मात्र नाईलाजास्तव भाड्याच्या घरात राहावे लागत आहे. त्यातच अस्तित्वात असलेल्या निवासस्थानांची अवस्था वास्तव्यालायक नसल्याने त्यांचा उपयोगही होऊ शकत नाही. या प्रकाराची दखल शासनाने घेऊन अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारून त्यांना मुख्यालयी ठेवण्याची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
वाशिम जिल्ह्यात निवासस्थानाअभावी अधिकाऱ्यांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 3:50 PM
वाशिम: जिल्ह्यातील विविध विभागांत कार्यरत अधिकाऱ्यांसाठी मुख्यालयाच्या ठिकाणी निवासस्थानाचा अभाव आहे. शासकीय निवासस्थान नसल्याने काही अधिकारी भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहेत. तर काहींना मात्र अगदी परजिल्ह्यातूनही अपडाऊन करावे लागत आहे.
ठळक मुद्देमुख्यालयात पदस्थापनेनंतर रुजू झालेल्या काही अधिकाऱ्यांसाठी शासकीय निवासस्थाने मात्र उभारण्यात आली नाहीत.परिणामी काही अधिकाऱ्यांना भाड्याच्या घरांत वास्तव्य करावे लागत आहे. तालुकास्तरावरही हीच स्थिती असून, काही बडे अधिकारी या कारणामुळे परजिल्ह्यातून अपडाऊन करीत आहेत.