जिल्ह्यात वाशिम-कारंजा, मानोरा-महान, मालेगाव-मेहकर, अकोला-हिंगोली हे महामार्ग आता अंतीम टप्प्यात आहेत. या महामार्गावर शेलूबाजार, शिवणी, धानोरा, साखरडोह, शिरपूर सारखी ग्रामीण भागांतील मोठी गावे आहेत. या गावांतील मुख्य चौकांत मोठी वर्दळ राहत असल्याने चौकात चारही दिशेने येणाºया मार्गावर गतिरोधक आवश्यक आहेत; परंतु कंत्राटदार कंपन्यांनी एकाच मार्गावर गतिरोधके तयार केली आहेत. त्यात नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्ग आणि अकोला-आर्णी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शेलुबाजार येथील मुख्य चौकांत या दोन महामार्गावर एकही गतीरोधक नाही. त्यात वाहने सुसाट धावत असल्याने अपघाताला आमंत्रण मिळत असून, या ठिकाणी पादचाºयांना जीवमुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. याची दखल राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण वा संबंधित यंत्रणेने घेऊन येथे रबरी गतीरोधक बसविण्याची मागणी होत आहे. महामार्गाच्या निमीर्तीनंतर वाहनांचा वेगही वाढला आहे. या मार्गावर वाहने सुसाट धावतात. यामुळे चौकात बालके, वयोवृद्ध आणि महिलांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. घाईगडबडीने मार्गक्रमण करणाºया वाहनचालकांमुळे या चौकात अपघात घडण्याची भिती वाढली आहे. त्यामुळे धोकादायक ठरणाºया राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी येथे रबरी गतिरोधक बसविणे आवश्यक असून, तशी मागणीही ग्रामस्थ, प्रवाशांकडून केली जात आहे.
महामार्र्गालगत मोठ्या गावांतील मुख्य चौकात गतिरोधकाचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:42 AM