लोकमत न्यूज नेटवर्करिसोड: नाफेडकडून तूर खरेदी बंद झाली, तेव्हापासून लाखो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. हमीदराने ती विकत घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमध्ये जोर धरत आहे.तुरीला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी मे महिन्यात नाफेड केंद्रावर तूर खरेदीसाठी नेली होती. ३० मेपर्यंत टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी होणे अपेक्षित होते; मात्र शेकडो शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी झाली नाही. परिणामी हजारो क्विंटल तूर मोजणीविना पडून आहे. खासगी बाजारात तुरीला हमीभाव नसल्याने आणि टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांना तुरीची खरेदी होण्याची हमी नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
लाखो क्विंटल तूर घरातच पडून!
By admin | Published: July 17, 2017 2:43 AM