लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: येथील ग्रामीण रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागाला वैद्यकीय अधिकारी मिळाल्याने या कक्षाचे कुलूप लवकरच उघडणार आहे. अत्याधुनिक यंत्र व अधिकाºयाविना सदर कक्षाला गत ८ वर्षांपासून कुलूप लागले होते.तालुक्यातील नागरिक व रुग्णांना, एक्सरेची व्यवस्था नसल्याने अकोला, वाशिम जावे लागत होते, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.श्रीकांत जाधव यांनी यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक व वरिष्ठांकडे पाठपुरावा करून अधिकाºयांचे पद भरण्यासाठी प्रयत्न केले. आता अत्याधुनिक संगणकीय क्ष किरण यंत्र तसेच कर्मचारीसुद्धा उपलब्ध करण्यात आला आहे. सोमवार, २८ आॅगस्टपासून सदर कक्ष जनसेवेत येणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मंगरुळपीर तालुक्यात ग्रामीण रुग्णालयांतर्गत शंभराचे वर गावाचा समावेश तर आहे. याशिवाय कारंजा, मानोरा व वाशिम हद्दीतील काही गावे व या मार्गावर घडणारे अपघात पाहता मंगरुळपीर ग्रामीण रुग्णालयात अधिक संख्येने रुग्ण येतात. या दृष्टीने येथे एक्स रे मशीन देण्यात आली होती. मात्र ती कालबाह्य झाल्याने व कर्मचाºयांची उणिव असल्याने येथीय क्ष किरण विभाग मागील ८ वर्षापासून बंद होता. हा कक्ष सुरू करण्यासंदर्भात डॉ.श्रीकांत जाधव यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. वरिष्ठांनी अत्याधुनिक संगणकीय यंत्रासह कर्मचारी दिला आहे. त्यामुळे हा कक्ष सुरू होणार आहे. आता कुठलेही फ्रॅक्चरची पूर्व तपासणी येथे होणार आहे.
मंगरूळपीरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या ‘क्ष-किरण’ विभागाचे उघडणार कुलूप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 7:34 PM
मंगरूळपीर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागाला वैद्यकीय अधिकारी मिळाल्याने या कक्षाचे कुलूप लवकरच उघडणार आहे. अत्याधुनिक यंत्र व अधिकाºयाविना सदर कक्षाला गत ८ वर्षांपासून कुलूप लागले होते.
ठळक मुद्दे वैद्यकीय अधिकारी मिळाल्याने उघडणार कक्षाचे कुलूप ८ वर्षांपासून लागलेले होते कुलूप