लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : जगभरातील बौद्धबांधवांचे एक प्रतीक म्हणून ‘धम्मध्वज’ मान्यता पावलेला आहे. मालेगाव येथील पखाले परिवाराने विशाल आकाराचा बनविलेला धम्मध्वज समाजबांधवांचे लक्ष वेधत असून, हा धम्मध्वज औरंगाबाद येथील भिक्खू प्रशिक्षण केंद्राला दान म्हणून दिला जाणार आहे.बौद्ध धर्माच्या प्रचार, प्रसारासाठी संपूर्ण जगात एकच प्रतीक असावे या विचाराने सन १८८८ च्या सुमारास सिलोनचे धम्मपाल महास्थवीर गुणानंद, सुमंगल, जी.आर. डिसिल्व्हा आदिंनी निळा, पिवळा, लाल, पांढरा व केशरी रंगाच्या उभ्या व आडव्या ठराविक पट्ट्यांच्या विश्व धम्मध्वजाची निर्मिती केली होती. या धम्मध्वजाला विश्व मान्यता प्राप्त झाल्याने बौद्ध धर्मातील सण, उत्सव, बुद्ध पौर्णिमा तसेच महत्त्वाचे मंगलदिनी अनेकांच्या घरावर, विहार तसेच सार्वजनिक ठिकाणी धम्मध्वज फडकविला जातो. मालेगाव येथील ‘स्तूप’ निर्मिती प्रक्रियेत पुढाकार असलेल्या ललीता सुधाकर पखाले व सुधाकर ग्यानुजी पखाले परिवाराने १२ फुट उंच व १५ फुट रुंद असा विशाल धम्मध्वज तयार केला असून, हा धम्मध्वज औरंगाबाद येथील भिक्खू प्रशिक्षण केंद्राला दान म्हणून दिला जाणार आहे. हा धम्मध्वज वाशिम जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या आकाराचा मानला जात आहे. मालेगाव येथील चैत्य भूमितील धम्मस्थान स्तूप येथे पंचशील विहार भिमनगरच्या वर्धापण दिनी भारतीय बौद्ध महासभा, उपासक व उपासिका यांच्या उपस्थितित विशेष वंदना घेवून हा धम्मध्वज काही वेळेपुरता इतरांना पाहण्यासाठी खुला ठेवण्यात आला होता. याप्रसंगी शहरातील उपासक, उपासिका, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मालेगाव येथे विशाल आकाराच्या धम्मध्वजाने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 1:56 PM
मालेगाव येथील पखाले परिवाराने विशाल आकाराचा बनविलेला धम्मध्वज समाजबांधवांचे लक्ष वेधत असून, हा धम्मध्वज औरंगाबाद येथील भिक्खू प्रशिक्षण केंद्राला दान म्हणून दिला जाणार आहे.
ठळक मुद्देबौद्ध धर्मातील सण, उत्सव, बुद्ध पौर्णिमा तसेच महत्त्वाचे मंगलदिनी अनेकांच्या घरावर, विहार तसेच सार्वजनिक ठिकाणी धम्मध्वज फडकविला जातो. ललीता सुधाकर पखाले व सुधाकर ग्यानुजी पखाले परिवाराने १२ फुट उंच व १५ फुट रुंद असा विशाल धम्मध्वज तयार केला.