मालेगाव (जि.वाशिम):स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे राजकीय वातावरण आता खर्याअर्थाने तापले असून सोमवार, ११ जुलै या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल १२0 जणांनी माघार घेतली.१८ जागांसाठी ३१ जुलै रोजी होत असलेल्या बाजार समिती संचालकांच्या निवडणूकीसाठी १७ जूनपासून नामनिर्देशन पत्न दाखल करणे सुरू आहे. १३ जुलैला उमेदवारांच्या अंतिम याद्या प्रसिद्ध केल्या जाणार असून ३१ जुलैला प्रत्यक्ष निवडणूक आणि १ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी एकंदरित १७१ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी १२0 अर्ज सोमवारी मागे घेण्यात आले. त्यामुळे आता राहिलेल्या उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. बाजार समिती संचालकपदाच्या या निवडणूकीत काँग्रेसचे आमदार अमीत झनक, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप जाधव आणि मनसेच्या अशोक अंभोरे यांनी युती करून एकत्नीत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख आणि भारतीय जनता पार्टीत अद्याप एकमत नसल्याची माहिती राजकीय गोटातून मिळाली. काही दिवसांपूर्वी माजी खासदार देशमुख गट आणि भाजपा एकत्न निवडणूक लढणार, अशी चर्चा होती. मात्न, स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेतल्याने अद्याप कुठलाच निर्णय झालेला नाही. शिवसंग्राम पक्ष यावेळी निवडणूक रिंगणात नसल्यासारखाच आहे. या पक्षाकडून अद्याप प्रभावी उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही.
अखेरच्या दिवशी १२0 अर्ज मागे
By admin | Published: July 12, 2016 12:32 AM