वाशिम : जिल्ह्यातील सर्व ७९३ महसुली गावांची खरीप हंगामाची पैसेवारी ५0 पैसेपेक्षा कमी आली असून, जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४२.८३ पैसे निश्चित करण्यात आली आहे. खरीप हंगामाची यापूर्वी जिल्ह्याची अंदाजे सुधारित पैसेवारी ४४ पैसे इतकी ठरविण्यात आली होती. अंतिम पैसेवारी ४२.८३ पैसे निश्चित करण्यात आली आहे. वाशिम तालुक्याची अंदाजे सुधारित पैसेवारी ४४ पैसे इतकी ठरविण्यात आली होती, तर मालेगावची सुधारित पैसेवारी ४७ पैसे, रिसोडची सुधारित पैसेवारी ४६ पैसे व कारंजाची सुधारित पैसेवारी ३७ इतकी ठरविण्यात आली होती. या चारही तालुक्याच्या पैसेवारीत कोणताही बदल झालेला नसल्याने ती अंतिम करण्यात आली आहे. मंगरूळपीर तालुक्याची अंदाजे सुधारित पैसेवारी ४६ पैसे ठरविण्यात आली होती, अंतिम पैसेवारीत ती ४२ पैसे झाली आहे. तर मानोराची अंदाजे सुधारित पैसेवारी ४७ पैसे ठरविण्यात आली होती, अंतिम पैसेवारीत ती ४१ पैसे झाली आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील १३९ गावांचा समावेश आहे. तसेच मालेगाव तालुक्यातील १२२, रिसोड तालुक्यातील १00, मंगरूळपीर १३७, कारंजा १६७, मानोरा तालुक्यातील १३६ असे एकूण सहाही तालुक्यातील सर्व ७९३ गावांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.
अंतिम पैसेवारी ४२.८३ पैसे
By admin | Published: January 15, 2015 12:30 AM