लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील ९३ शाळांमध्ये यंदा ‘आरटीई’अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. त्याची ३० मार्च ही अंतीम मुदत अवघ्या तीन दिवसांवर आली असून आॅनलाईन अर्ज सादर करताना पालकांची चांगलीच धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे. चालू महिन्यातील ५ मार्चपासून ‘आरटीई’साठी आॅनलाइन प्रवेश अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याची अंतीम ३० मार्च रोजी संपणार आहे. आजपर्यंत १७ दिवस आॅनलाईन पद्धतीने जिल्ह्यातून अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत. शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक व दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात आली आहे. जिल्ह्यातील शाळेत आरटीई २५ टक्के प्रवेशास पात्र असणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शिक्षण विभागाने अर्ज मागविले होते. त्यास पालकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिक्षणाधिकाºयांनी सांगितले.
‘आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी उरले शेवटचे तीन दिवस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 5:26 PM