कारंजा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत राज्य मार्ग-२७४ ला जोडणाऱ्या जानोरी, पानगव्हाण, उकर्डा, पारवा कोहर तसेच चांदई रस्त्याकरिता ७ कोटी ११ लाख १५ हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. वरील कामांचा भुमिपुजन समारंभ कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ.राजेंद्र पाटणी यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.राजीव काळे यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.
जानोरी येथे सकाळी ८ वाजता पार पडलेल्या भुमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी चंद्रकिरण भिंगारे,अमोल भिंगारे, एकनाथ भिंगारे, गुलाबराव दोनोडे, सुखदेव भिंगारे, रूपराव भिंगारे, सुभाष मुळे, संजय हत्तीमारे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थांची उपस्थिती लाभली होती.
पानगव्हाण येथे सकाळी ८.३० वाजता पार पडलेल्या भुमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी डॉ.शरद दहातोंडे, राजेंद्र काळे, अण्णा वासुदेवराव ताठे,ज्ञानेश्वर बाबुलाल ताठे, केवल पवार, संदीप सुपनार, आदीत्य काळे, दयाराम भोजराज पवार, किशोर राठोड, रामहरि पवार, आदींसह बहुसंख्य ग्रामस्थांची उपस्थिती लाभली होती.उकर्डा येथे सकाळी ९ वाजता पार पडलेल्या भुमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी डॉ.शरद दहातोंडे,बाळु थोरात, राजु फरास, अण्णा पाटील, परशराम शितोळे, आदींसह बहुसंख्य ग्रामस्थांची उपस्थिती लाभली होती.पारवा कोहर येथे सकाळी ९.३० वाजता पार पडलेल्या भुमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी डॉ.शरद दहातोंडे, सरपंच विलास आवटे, अण्णापाटील मुंदे, रवि घुले, बाळु थोरात, ग्रामसेवक राजगुरू,बबलु ढोले, अजाबराव भोजणे, अनिल डोंगरे,सुभाष परंडे, राहुल वैद्य, भागवत कोहर,जगदीश भोजणे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थांची उपस्थिती लाभली होती. चांदई येथे सकाळी १० वाजता रस्त्याचे तसेच सामाजिक सभागृहाचे पडलेल्या भुमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी गुलाबराव पिसे, त्र्यंबक पाटेकर, पोलिस पाटील पंजाबराव पिसे,डॉ.शरद दहातोंडे, मधुकर पिसे, हिम्मत पिसे,मंगेश पिसे, सुभाष परांडे, जगदिश भोजणे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थांची उपस्थिती लाभली होती. यावेळी आ.राजेंद्र पाटणी यांच्यासोबत अनिल पाटील कानकिरड,श्रीकृष्ण मुंदे, संजय भेंडे, संजय घुले, अमोल भोकरे आदींसह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.