लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : महाराष्ट्र शासन जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र अंतर्गत दुसºया टप्प्यात कारंजा तालुक्यातील पिंपळगाव गुंजाटे येथे नालाखोलीकरण व समतल चर खोदकामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटणी यांच्याहस्ते १० डिसेंबर रोजी करण्यात आला. यावेळी सरपंच बाबाराव गुंजाटे, विनायक गुंजाटे, किशोर काठोडे, मुलीधर भोयर, रमेश गुजाटे, विठ्ठल दोरीक, विशाल गुजाटे, राजीव भेंडे, गुड्डू कानकीरड, बिजीएसचे अक्षय शेरसुरकर, प्रफुल बाणगावकर, राजेश हवा यांची उपस्थिती होती. या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटणी यांनी समतल चर खोदकामाची पाहणी करून नाला खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला. गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी जलसंधारणाच्या कामात स्वयंस्फुर्तीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार पाटणी यांनी केले. जलसंधारणाच्या या कामांना नागरिकांचा उ्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचे अभियंता सैय्यद शेख यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी ग्राम वाहितखेड येथे कृषी विभागाच्या १२ हेक्टर क्षेत्रावर समतल चर खोदकामाचा शुभारंभ तालुका कुषी अधिकारी संतोष वाळके व कृषी पर्यवेक्षक आर. एस. घुले, ग्रामसेविका एस. डी. काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.कारंजा तालुक्यात जलसंधारणाच्या कामांना नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. भारतीय जैन संघटनेच्यावतीने जेसीबी तसेच पोकलन मशिन मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत तर शासनाच्यावतीने डिझेल पुरविले जात आहे. जलसंधारणाच्या कामांना ‘लोकचळवळी’चे स्वरुप प्राप्त होत असल्याचे दिसून येते.
‘सुजलाम, सुफलाम’अंतर्गत कारंजा तालुक्यात जलसंधारण कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 6:10 PM