लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शिरपूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाºया मांगूळझनक या गावात चालणाºया जुगार अड्डयावर १३ आॅक्टोबरच्या सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून ५२ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ११ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपींमध्ये मांगूळझनकच्या सरपंचपतीचाही समावेश आहे.शरद मंडलिक नावाचा इसम प्रदिप घोटे (रा.मांगूळझक) यांच्या शेतातील टिनशेडमध्ये जुगार अड्डा चालवत असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यावरून जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थनिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी पथक तयार करून मांगूळझनक गावाकडे रवाना केले. यादरम्यान पोलिसांचा सुगावा लागताच जुगार खेळणारे लोक शेडमधून पळून जात असताना पथकातील अधिकारी, कर्मचाºयांनी पाठलाग करून मांगूळझनकचे सरपंचपती दत्तात्रय नारायणराव झनक यांच्यासह शे. युसूफ शे. यासीन, संतोष किसनराव आखाडे (डोणगाव, जि.बुलडाणा), शे.कडू शे. वली, शे.वजीर शे. जलाल (गोहगाव, जि.बुलडाणा), संतोष प्रल्हाद बोरकर (शेलगाव, जि.बुलडाणा), पांडूरंग बळीराम कव्हर (दुधाळा, ता.वाशिम) अशा ७ आरोपींना जेरबंद केले. तसेच रवी नरवाडे (आंचळ, जि.बुलडाणा, शरद मंडलिक, प्रदिप घोटे, पंजाब घोटे (मांगूळझनक) हे चार आरोपी फरार झाले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कैलास इंगळे यांच्या फिर्यादीवरून नमूद ११ ही आरोपींवर शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये कलम १२ (अ) जुगार अॅक्टअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कामगिरी परिविधाधिन पोलिस उपअधिक्षक सुनील पाटील, अतूल मोहनकर, दिनकर गोरे, भगवान गावंडे, किशोर चिंचोळकर, सुनील पवार, प्रेम राठोड, नीलेश इंगळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पार पाडली.मुद्देमालासंदर्भात उलटसुलट चर्चा !मांगुळ झनक येथे जूगारप्रकरणी ११ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. मात्र आरोपींना शिरपूर पोलीस स्टेशन पर्यंत आणण्यात आले नाही. आरोपींना मांगुळ झनक येथेच समन्सपत्र देऊन सोडून देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या या भूमिकेबद्दल परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. जुगारातून जप्त केलेला मुद्देमालही कमी दाखवल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आरोपींवर गुन्हे दाखल करून तथा जागीच समन्स देऊन सोडता येते. मात्र, त्यांच्यावर दाखल केसेस कोर्टात सुरू राहतात. -शिवाजी ठाकरे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम
मांगूळझनक येथे एलसीबीची जुगारावर धाड; ११ जणांविरूद्ध गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 4:30 PM