लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातील इंझोरी शिवारात कृषीपंप जोडणीसाठी उभारलेले वीज खांब गतवर्षीच्या पावसामुळे जमिनीकडे झुकले आहेत. आता वादळी वाºयामुळे हे खांब कोसळून कोसळून अपघात घडण्याची भिती आहे. मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती अंतर्गत हे खांब सरळ करणे आवश्यक असतानाही कंत्राटदाराकडून याबाबत दिरंगाई होत असल्याचे दिसत आहे.महाविजरणच्यावतीने कृषीपंपासाठी शेतकºयांना वीज जोडणी देण्यासाठी शेतात वीज खांब रोवले आहेत. हे खांब रोवताना मजबुतीची फारशी काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळेच गतवर्षीच्या पावसाळ्यात जमिनीत पाणी मुरल्यानंतर अनेक खांब जमिनीलगत झुकले असून, खांबाच्या ताराही लोंबकळत आहे. पावसाळ्यात वादळीवाºयामुळे हे एखादवेळी कोसळल्यास अपघात घडण्याची भिती आहे. अशात शेतात काम करणाºया शेतकरी, शेतमजुराचा जीवही धोक्यात येण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत शेतकरी मशागतीची कामे करीत असून, एखादा झुकलेला खांब कोसळल्यास त्या खांबाच्या लांबवर पसरलेल्या इतर शेतातील ताराही जमिनीवर पडून काम करणारी गुरे, शेतकरी, शेतमजुरांना वीजेचा धक्का बसून अनर्थ घडू शकतो. विशेष म्हणजे महावितरणच्यावतीने मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती अंतर्गत निविदा काढून या कामाचे कंत्राटही दिले असून, परिसरातील शेतकरी या खांबाची दुरुस्ती करण्याची मागणीही वारंवार करीत आहेत; परंतु अपुºया मनुष्यबळाचे कारण समोर करून हे खांब सरळ उभे करण्याचे काम प्रलंबित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकºयांचा जीव मात्र धोक्यात असल्याचे स्पष्ट होत आहे.
शिवारातील झुकलेले खांब देताहेत अपघातास निमंंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 4:32 PM