आदिनाथ दिगंबर जैन मंदिर संस्थान चे सचिव राजेश येळवनकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून सुभाष हातोलकर उपस्थित होते. कार्यक्रमात भगवान महावीर तसेच जैन धर्माविषयी सुभाष हातोलकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, आजच्या आधुनिक काळातही अपरिग्रह आणि अनेकांतवाद हे दोन्ही प्रभावी तत्त्वे उपकारक आहेत. जैनांची आहार शैली सुद्धा प्रभावी असून त्याचे जीवनात पालन करणे आवश्यक आहे. विलगीकरणही सुद्धा जैन तीर्थंकर यांची देण असून, कोरोना परिस्थितीमधे अडीच हजार वर्षांनंतर ही आज कामी येत आहे.
महात्मा गांधी यांनी भारतीय स्वातंत्र्य लढा हा महावीरांच्या तत्त्वावर लढला असे सांगत या कोरोना परिस्थितीमध्ये सगळ्या जनतेने सजग राहून ही लढाई जिंकली पाहिजे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन राजेश येळवनकर यांनी केले. यावेळी आभा जैन, सारिका करेवार हिंगोली, प्रमोद पाडळकर औरंगाबाद, विनोद बान्डे पूसद, गीता वोरा, सुनील सपकाळ, मनीष गावंडे
अश्विनी जैन, आयुष येळवणकर, राजेश जैन जालना, हर्षल हिंवसे जयंत येळवणकर अकोला आदी जण कार्यक्रमांत सहभागी झाले होते.