स्वतंत्रता अमृत महोत्सव व कायदेविषयक जनजागृतीचा कार्यक्रम मंगरुळपीर येथील पंचायत समीतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मार्गदर्शन करण्यात आले आणि या कार्यक्रमात दोन्ही न्यायाधीशांच्या वतीने कायदेविषयक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
नागरिकांमधील कायदेविषयी संभ्रम आणि असमंजस स्थिती दूर करण्याविषयी माहिती या चर्चासत्रातून देण्यात आली आणि नागरिकांना महिला कायद्याविषयी, घरगुती हिंसाचार विषयी, तसेच खोटे गुन्हे कसे दाखल करण्यात येतात, या विषयावरही जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सह.दिवानी न्यायाधीश एन.के. मेश्राम (कनिष्ठ स्तर), प्रमुख अतिथी दुसरे सह.दिवानी न्यायाधीश आर.एस. मानकर (कनिष्ठ स्तर) हे होते, तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून ॲड.पी.आर.बंग, ॲड. बी.वाय. शुंगारे, ॲड.पी.एम.भगत, एम.के.मुळे, पोलीस निरीक्षक धनंजय जगदाळे हे होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एन.सरकाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ॲड.बी.वाय. शृंगारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.