यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी.पी. देशपांडे, अॅड. छाया मवाळ, अॅड. माधुरी वायचाळ, अॅड. दीपाली सांबर, संस्थाध्यक्ष सुनील पाटील यांची उपस्थिती होती. देशपांडे यावेळी म्हणाले, बालकांकडून अज्ञान वयात तरुण सुलभ गोष्टीतून होणा-या चुकांकरिता त्यांना जन्मभर त्रास सहन करावा लागू शकतो. अॅड. माधुरी वायचाळ यांनी पोक्सो अर्थात बाल लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याबाबत माहिती दिली.
अॅड. दीपाली सांबर यांनी बालवयात प्रेम व विवाह यांचे संभाव्य दुष्परिणाम विशद केले. विद्यार्थ्यांनी या काळात फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, अन्यथा जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असे सांगितले. अॅड. मवाळ यांनी मोबाइलचा गैरवापर घातक ठरू शकतो, असे सांगून विद्यार्थ्यांनी बुद्धीसोबतच मनाचाही विकास करून घेतला पाहिजे, असे सांगितले. सूत्रसंचालन लठाड यांनी केले. पाटील यांनी आभार मानले.