वाशिम : महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता स्थानिक विश्रामगृह येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून गारपिटग्रस्त भागाची माहिती घेतली.
माणिकराव ठाकरे यांचे यवतमाळ येथून १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता वाशिम विश्रामगृह येथे आगमन झाले. येथे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीपराव सरनाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, जिल्हा परिषद सदस्य नथ्थूजी कापसे यांच्यासह काँग्रेसचे विनोद जोगदंड, शंकर वानखेडे, डॉ. विशाल सोमटकर, महादेव सोळंके, प्रा. अबरार मिर्झा, समाधान माने, हरिष चौधरी, वा.के. इंगोले, मोहन इंगोले, प्रा. संतोष दिवटे, बी.के. देशमुख यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती होती. यावेळी अवकाळी पाऊस व गारपिट आणि शासनातर्फे नुकसानभरपाई या विषयावर चर्चा झाली. गारपीट व अवकाळी पावसामुळे रिसोड व मालेगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, शासनाने भरघोष भरपाई तातडीने द्यावी अशी मागणी काँग्रेस पदाधिकाºयांनी केली. गारपिटग्रस्तांना समाधानकारक भरपाई मिळावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी दिली. शासनाकडून शेतकºयांना दिलासा मिळत नसून, शेतकºयांचा भ्रमनिरास झाला आहे. शेतकºयांसाठी ‘अच्छे दिन’ कधी येणार? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. या बैठकीनंतर माणिकराव ठाकरे हे रिसोड तालुक्यातील जोगेश्वरी, नेतन्सा, महागाव यासह गारपिटग्रस्त गावांना भेटी देण्यासाठी रवाना झाले.