शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
2
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
3
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
4
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
5
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
6
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
7
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
8
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
9
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
10
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
11
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
12
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
13
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
14
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
15
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
16
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
17
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
18
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
19
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
20
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

पूरभूर शेतशिवारात मृतावस्थेत आढळला बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 5:55 PM

एका शेतात मंगळवार, २४ डिसेंबर रोजी मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्क शेलूबाजार (वाशिम) :  मंगरूळपीर तालुक्यातील पूरभुर शेतशिवारात एका शेतात मंगळवार, २४ डिसेंबर रोजी मृतावस्थेत बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.गत २० ते २५ दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी बिबट्या आढळून आल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. विशेष: मालेगाव तालुक्यात शिरपूर परिसरात बिबट्या आढळून येत आहे. मालेगाव तालुक्यातच १० दिवसांपूर्वी बिबट्याने एका जनावराची शिकारही केल्याची माहिती समोर आली होती. आता शेलुबाजारनजीक असलेल्या पूरभूर शिवारात मृतावस्थेत बिबटया आढळून आल्याने जिल्ह्याच्या काही भागात बिबट्याचा वावर असल्याच्या वृत्ताला चांगलाच दुजोरा मिळाला. अन्नाच्या शोधात निघालेल्या बिबट हा पूरभूर शेतशिवारातील सुमेध इंगोले यांच्या शेतात आढळून आला. मंगळवारी सकाळी फेरफटका मारण्यासाठी इंगोले शेतात गेले असता त्यांना  मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. त्यांनी वनमजुराला याची माहिती दिल्यानंतर संबंधित अधिकाºयांचा ताफा घटनास्थळावर पोहचून पंचनामा केला. सदर बिबट्याचा मृत्यु संशयास्पद असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.  या परिसरात काटेपुर्णा अभयारण्य असल्यामुळे येथे नेहमीच बिबट्याचा वावर आढळून येत असतो. मृतावस्थेत बिबट आढळल्याची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी सदर बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टिम मंगरुळपीर शाखा वनोजाच्या सदस्यांचे सहकार्य महत्वाचे ठरले. शवविच्छेदनासाठी बिबट्याचा मृतदेह वनविभागाच्या कर्मचाºयांनी कारंजा येथे हलविला आहे. दरम्यान, या घटनेमुळे शेलुबाजारसह पूरभूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमleopardबिबट्या