वाशिम, दि. २३ : दोनवेळा मुदत वाढवून देवूनही प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे जिल्ह्यातील तब्बल ४२ टक्के शेतकर्यांनी पाठ फिरवली. २ लाख ४0 हजार शेतकर्यांपैकी केवळ १ लाख २९ हजार शेतकर्यांनीच खरिपातील पिकांचा विमा उतरविल्याची बाब समोर आली आहे. राज्यशासनाच्या पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार ८५३ शेतकर्यांना गत खरीप हंगामात पीकविमा मंजूर झाला होता. मात्र, पीकविम्याची रक्कम अदा करताना अनेक शेतकर्यांना नुकसानाच्या तुलनेत अगदीच तुटपूंजी रक्कम मिळाली. यामुळे पीकविम्याबाबत बहुतांश शेतकर्यांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. यामुळेच की काय, यंदा तब्बल दोनवेळा मुदतवाढ देवूनही १0 ऑगस्ट या शेवटच्या मुदतीपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ४0 हजार शेतकर्यांपैकी केवळ १ लाख २९ हजार शेतकर्यांनीच खरिपातील पिकांचा विमा उतरविण्याबाबत उत्साह दाखविला. इतर सुमारे ४0 टक्के शेतकर्यांनी शासनाच्या या उपक्रमाकडे सपशेल पाठ फिरवली आहे. ह्यलीड बँकह्ण व कृषी विभागात असमन्वयाचे वातावरणपंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये सहभागी होण्याची अंतीम मुदत १0 ऑगस्ट होती. त्यास सद्या १३ दिवसाचा कालावधी उलटला. असे असताना अंतीम मुदतीपर्यंत किती शेतकर्यांनी प्रत्यक्षात विमा उतरविला, याची अद्ययावत माहिती कृषी विभागाकडे नाही. यासंदर्भात कृषी विभागातील संबंधिताशी चर्चा केली असता, ९४ हजार शेतकर्यांनी विमा उतरविल्याचे सांगण्यात आले. लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी मात्र १ लाख २९ हजार शेतकर्यांनी विमा योजनेत सहभाग नोंदविला, अशी माहिती दिली. यावरून कृषी विभाग आणि लीड बँकेमध्ये विमा योजनेसंबंधी पुरते असमन्वयाचे वातावरण असल्याची बाब सिद्ध झाली. तथापि, कृषी विभागाच्या या धोरणामुळे विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.जिल्ह्यातील २ लाख ४0 हजार शेतकर्यांपैकी १0 ऑगस्टपर्यंत १ लाख २९ हजार शेतकर्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे. संबंधितांचे सविस्तर प्रस्ताव तयार करून शासनाकडे लवकरच पाठविले जाणार आहेत. याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयालाही माहिती पुरविण्यात आली आहे.- एस.एस.मेहताव्यवस्थापक, अग्रणी बँक, वाशिम
४२ टक्के शेतक-यांची पीक विम्याकडे पाठ!
By admin | Published: August 23, 2016 11:43 PM