०००००००००००००००००००००००००००
पुढच्या कॅम्पचे नियोजन कठीण
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे जिल्ह्यातील सुशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निर्धारित उद्दिष्टानुसार रोजगार मेळावे, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते. यात आधीचे स्थगित शिबिर पूर्ण करणेच धडपडीचे ठरले असताना पुढच्या शिबिरांचे नियोजन कठीण झाले आहे.
००००००००००००००००००००००००
कशी मिटणार रोजगाराची समस्या?
जिल्ह्यात गतवर्षी पंतप्रधान कौशल्य विकास योजना ३.० अंतर्गत ९५ उमेदवारांच्या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट होते. यात फिल्ड टेक्निशियन अदर होम अप्लायन्सेसच्या प्रशिक्षणासाठी ३०, तर मोबाइल फोन, हार्डवेअर रिपेअरिंगसाठी ३० उमेदवारांची निवड झाली; परंतु कोविडमुळे हे प्रशिक्षण शिबिर स्थगित झाले. आता ४० टक्क्यांहून अधिक उमेदवार सोडून गेले असून, ते उपलब्ध होणे कठीण झाले आहे. हीच स्थिती राहिली तर रोजगाराची समस्या कशी मिटणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
------------
कोट:
गतवर्षी पंतप्रधान कौशल्य विकास योजना ३.० अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिर कोविड-१९ मुळे स्थगित करावे लागले. आता हे शिबिर पूर्ण करायचे असताना उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद लाभत नाही. तथापि, त्यांचे समुपदेशन करून व त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना प्रशिक्षणासाठी तयार करू व शिबिरही पूर्ण करू.
- सुनंदा बजाज,
साहाय्यक आयुक्त,
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र