शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खरीप पीक कर्जाकडे शेतकऱ्यांची पाठ!

By admin | Published: May 30, 2017 1:46 AM

थकबाकीत रक्कम वळती होत असल्याचा परिणाम : २९ मे पर्यंत केवळ २३६ कोटींचे कर्ज वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम म्हटला की जुने कर्ज अदा करायचे आणि नव्याने कर्ज घ्यायचे, अशी पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे; परंतु यंदा आर्थिक अडचणीत सापडलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पीक कर्ज अदा केले नाही. यासह पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही नगण्य आहे. ११५० कोटी रुपये उद्दिष्ट असताना २९ मेपर्यंत केवळ २३६ कोटी रुपये कर्ज वाटप झाले आहे.गतवर्षी जुलै २०१६ पर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकऱ्यांना ८९० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले होते. त्यापैकी यंदा केवळ २५० कोटी रुपयांच्या आसपास रक्कम वसूल झाली आहे. उर्वरित ६४० कोटी रुपये वसूल करणे बँकांना अशक्य होत असून, शेतकरीही शासनाकडून कर्जमाफी मिळेल, या अपेक्षेने रक्कम भरण्यास तयार नाहीत. तथापि, थकीत कर्ज भरल्याशिवाय नव्याने कर्ज मंजूर होत नाही, कर्ज मंजूर झाले तरी ती रक्कम जुन्या थकबाकीत वळती केली जात असल्याने शेतकऱ्यांनी बँकांच्या पायऱ्याच चढणे बंद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १.५ लाख शेतकऱ्यांना ११५० कोटी रुपये कर्ज वितरणाची तरतूद करण्यात आली आहे; मात्र खरीप हंगामातील पिकांची पेरणी प्रक्रिया अगदी जवळ येऊन ठेपली असताना आणि ३१ मे पर्यंत किमान ८० टक्के कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले असताना कर्ज घेण्यास शेतकरी तयार नसल्याने कर्ज वाटपाची टक्केवारी प्रचंड प्रमाणात घसरली आहे. एकूणच जुनी थकबाकी वसूल होणे कठीण झाले असून, नव्याने कर्ज वाटप प्रक्रियेलाही खीळ बसल्यामुळे भविष्यात पीक कर्ज वाटप करणाऱ्या मध्यवर्ती बँकेसह इतर बँकांची आर्थिक स्थिती कमकुवत होणार असल्याची भीती जाणकारांमधून व्यक्त केली जात आहे. दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस सुरू होऊन पेरणीची कामे सुरू होत असल्याने ३१ मे पर्यंत निर्धारित पीक कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी किमान ८० टक्के उद्दिष्ट गाठावे लागते. तशा प्रकारच्या सूचना जिल्ह्यातील संबंधित बँकांना यंदाही देण्यात आल्या आहेत; मात्र गतवर्षीच्या पीक कर्जाची रक्कम न भरण्यासोबतच शेतकऱ्यांनी नव्याने कर्ज उचलण्याकडेही पाठ फिरवल्याचे जाणवत आहे. - ज्ञानेश्वर खाडेजिल्हा उपनिबंधक, वाशिम.