लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात बऱ्याच अंशी शिथिलता मिळताच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी, चालक परवाना आदींसाठी सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या महिन्यातील तालुकानिहाय मासिक शिबिरांचे वेळापत्रक जाहिर केले.लॉकडाऊनमध्ये एप्रिल ते जून महिन्यादरम्यान वाहनविषयक कामे प्रभावित झाली होती. लॉकडाऊनमध्ये हळूृहळू शिथिलता मिळताच वाहन नोंदणी, कर वसुली, चालक परवाना आदी कामे पूर्ववत होऊ लागली. सप्टेंबर महिन्यापासून ‘अनलॉक-४’च्या टप्प्यात लॉकडाऊन बºयाच अंशी शिथिल झाल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयानेदेखील मोटार वाहन चालक, मालक यांच्या सोयीसाठी तालुकास्तरावरच वाहन कर वसुली, वाहन नोंदणी, चालक परवाना यासह वाहनविषयक अन्य कामे सुलभ करण्याकरीता सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीत तालुकानिहाय मासिक शिबिरांचे वेळापत्रक निश्चित केले. त्यानुसार कारंजा लाड येथे १८ सप्टेंबर, ५ व २० आॅक्टोबर, ५ व २० नोव्हेंबर, ४ व १८ डिसेंबर रोजी, रिसोड येथे ७ सप्टेंबर, ९ आॅक्टोबर, ९ नोव्हेंबर, ७ डिसेंबर रोजी, मानोरा येथे ११ सप्टेंबर, १४ आॅक्टोबर, ११ नोव्हेंबर, ११ डिसेंबर रोजी, मंगरूळपीर येथे १५ सप्टेंबर, १६ आॅक्टोबर, १७ नोव्हेंबर व १५ डिसेंबर रोजी मासिक शिबिर घेण्यात येणार आहे. नियोजित दिवशी शासकीय सुट्टी जाहीर झाल्यास दुसºया कार्यालयीन दिवशी शिबिर घेण्यात येईल.
नियमांचे पालन करण्याच्या सूचनाकोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने शिबिरादरम्यान कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मास्क किंवा रुमालचा वापर, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे आदी नियमांचे पालन होईल, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी, अशा सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने स्थानिक यंत्रणांना दिल्या.