- नंदकिशाेर नारेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : औरंगाबादहून आपल्या गावी निघालेल्या एका महिलेची बसमध्येच अचानक प्रकृती बिघडली व चक्कर येऊन पडली. बसचालकाने वेळेचा विलंब न करता सरळ बस जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रवाशांसह नेली. एसटी चालक महत्प्रयासानंतरही ‘अनुसया’ नामक महिलेचे प्राण वाचू न शकल्याने त्यालाही अश्रू आवरता आले नसल्याची घटना वाशिम येथे २२ जून राेजी दुपारच्या दरम्यान घडली.औरंगाबादहून सवना ता. सेनगाव येथील रहिवासी महिला अनुसया संपतराव जाधव आपल्यागावी जाण्याकरिता निघाली हाेती. दुपारच्या दरम्यान वाशिम येथे पाेहचून तीने नांदेड जाणाऱ्या बस क्रमांक एमएच ४०वाय ५७४९ मध्ये बसली व सवना गावाची तिकीट घेतली. दरम्यान बस वाशिम येथून पुसद रस्त्यावर दाेन ते तीन कि.मी. जात नाही, अचानक प्रकृतीत बिघाड झाल्याने वाहकाने चालकाला बस दवाखान्यात नेण्याचे सांगितले. चालक व्ही. आर. वलके यांनी वेळेचा विलंब न करता भरधाव वेगाने हाॅर्न वाजवित बस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेली. धावपळ करीत महिलेला डाॅक्टरांना दाखविण्यात आले. डाॅक्टरांनी मात्र तिला मृत घाेषित केले. यावेळी प्रवाशांनी चालकाच्या कार्याचे काैतूक तर केले परंतु महिलेचे प्राण वाचू न शकल्याने हळहळही व्यक्त केली. या घटनेबाबत वाशिम आगार व्यवस्थापक विनाेद इलामे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दुजाेरा दिला.
बसचालकास आवरता आले नाही अश्रूलहान मुलगी साेबत असलेल्या महिलेचे प्राण वाचविण्यासाठी बसचालकाने केलेले प्रयत्न असफल झाल्याने बस चालकालाही अश्रू आवरता आले नाही. यावेळी प्रवाशांनी त्यांना चांगलाच धीर दिला.घटना घडल्यानंतर मृतक महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना हकीकत सांगण्यात आली.