-----
सोयाबीन खरेदी थांबविली
वाशिम : जिल्ह्यात वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता बाजार समित्यांमधील शेतमाल विक्रीसाठी येणाºया शेतकऱ्यांची गर्दी नियंत्रित केली जात आहे. याच आनुषंगाने कारंजा येथील बाजार समितीत सद्य:स्थितीत सोयाबीनची खरेदी थांबविण्यात आली आहे.
---------------
ज्येष्ठांनी तातडीने चाचणी करावी !
वाशिम : ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्गाची लागण लवकर होते. त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, घशामध्ये खवखवणे यांसारखी लक्षणे असल्यास त्यांनी तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे.
---------
बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यावर भर
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील सोनखास शिवारात बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पशुसंवर्धन विभागाने तपासणी सुरू केली आहे.
----------------
देगाव शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा
वाशिम : रिसोड तालुक्यातील देगाव येथील शाळेच्या वसतिगृहातील बाधित सर्व २२९ विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, आठवडाभरापासून त्यांची आरोग्य विभागाच्या पथकाकडून दिवसातून तीनवेळा आरोग्य तपासणी केली जात आहे.
----------------
खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन
वाशिम : आगामी खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने केली असून, शेतकऱ्यांना खते, बियाणे वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले जात आहे. शिवाय वीजजोडणीसह इतरही बाबींची माहिती घेतली जात आहे.