----
‘रिचार्ज शाफ्ट’मुळे जलपातळीत वाढ
वाशिम : महामार्गाच्या कामासाठी गौणखनिजांची पूर्तता करण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील शेलगाव शिवारातील शेततळे भूजल विकास आणि सर्वेक्षण संस्थेने तीन ‘रिचार्ज शाफ्ट’ खोदले आहेत. यामुळे परिसरातील भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
--------------
गावातील नाल्यांची साफसफाई
कामरगाव : कारंजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कामरगाव येथे महिनाभरापासून नाल्यांची सफाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत होते. ही बाब लक्षात घेत ग्रामपंचायतने नाल्यांची सफाई शनिवारी केली.
----
आयुर्वेदिक दवाखाना इमारत शिकस्त
धनज बु.: येथून जवळच असलेल्या राहाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्याची दीड वर्षांपासून इमारत शिकस्त झाली आहे. तथापि, या इमारतीच्या दुरुस्तीची दखल घेण्यात आली नाही. शिवाय परिसरात मोठ्या प्रमाणात घाण, कचरा पसरला आहे.
----------
आरोग्य कर्मचाऱ्यांची पाच पदे रिक्त
उंबर्डा बाजार : येथील आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत गेल्या कित्येक महिन्यांपासून ५ पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत २ अधिकारी आणि ११ कर्मचारी या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील ग्रामस्थांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळत आहेत.
--------
तलाठी कार्यालयाची स्थिती वाईट
तळप बु.: मानोरा तालुक्यातील तळप बु. येथील तलाठी कार्यालयाची अवस्था वाईट झाली आहे. इमारतीचे दरवाजे, खिडक्यांवरील खडंगे मोडकळीस आले आहेत. त्यामुळे या इमारतीच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.