वाशिम: जिल्हा वार्षिक योजना सन २0१५-१६ साठीच्या निधीची कमाल र्मयादा व विविध शासकीय यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या निधीच्या मागणीत मोठया प्रमाणात तफावत आढळली आहे. सर्वसाधारण उ पयोजनेत कमाल निधीची र्मयादा ७९ कोटी ३ लाख रूपये आहे. याकरिता मात्र १८५ कोटी ६३ लाख २८ हजार रूपयांच्या निधीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. जिल्हा वार्षिक योजना सन २0१५-१६ साठीचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी लहान गटाची बैठक जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार राजेंद्र पाटणी यांच्या प्रमुख उ पस्थितीत घेण्यात आली. विविध यंत्रणाकडून जिल्हा वार्षिक योजनेसाठी प्राप्त झालेल्या मागणी प्रस् तावावर या बैठकीत चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी लघु गटाच्या बैठकीचा उद्देश स्पष्ट कर ताना जिल्हा वार्षिक योजनांमधील निधीची कमाल र्मयादा व विविध शासकीय यंत्रणाकडून प्राप्त झालेल्या निधीची मागणी यामधील तफावत स्पष्ट केली. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सर्वसाधारण उ पयोजनेत कमाल निधीची र्मयादा ७९ कोटी ३ लाख इतकी आहे. यामध्ये १८५ कोटी ६३ लाख २८ हजार रूपये निधीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. अनुसूचित जाती उपयोजनेतून ४८ कोटी ९0 लाख निधीची र्मयादा असून त्यासाठी ४३ कोटी ४२ लाख ४८ हजार रूपयांचे प्रस्ताव आले आहेत. तसेच आदिवासी उपयोजनेतून १५ कोटी ४८ लाख २ हजार रूपये निधी उपलब्ध असून त्यासाठी ५0 कोटी ७0 लाख १४ हजार रूपयांचा प्रस्ताव आला आहे. यापैकी सर्वसाधारण उपयोजनेतून १0६ कोटी ६0 लाख २८ हजार रूपयांचे अतिरिक्त प्रस्ताव प्राप्त झाले आहेत तर आदिवासी उपयोजनेतून ३५ कोटी २२ लाख १२ हजार रूपयांचे अतिरिक्त प्रस्ताव आले आहेत. यावेळी जिल्हाधिकारी कुलकणी व आमदार राजेंद्र पाटणी यांनी सर्व शासकीय यंत्रणांनी सादर केलेल्या प्रस्तावांची व त्यांनी प्रस्तावित केलेल्या निधीतून कामांची माहिती घेतली. तसेच काही यंत्रणांनी सादर केलेल्या प्रस्तावामध्ये बदल सुचविला.
निधीची मर्यादा ७९ कोटी, प्रस्ताव मात्र १८५ कोटींचा
By admin | Published: January 17, 2015 12:40 AM