------------
कनेक्टिव्हिटीअभावी शेतकरी त्रस्त
वाशिम : गत काही दिवसांपासून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळणे दुरापास्त बनले असून त्यामुळे बाबंर्डा कानकिरड परिसरातील गावांतील विविध बँकांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून येत आहे. त्यातच पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची पंचाईत होत आहे.
-------------
पोहा परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : कारंजा तालुका कृषी विभागाच्यावतीने पेरणीसंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. याअंतर्गत परिसरातील काही गावांत कृषी सहायकांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कीटकनाशक फवारणीपूर्वी खबरदारी घेण्याचे आवाहन केले.
-----------
पाणंद रस्त्यांवर चिखल
काजळेश्वर : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर परिसरातील पाणंद रस्त्यांचे काम अर्धवट राहिल्याने या रस्त्यांवर पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतात साहित्याची ने-आण करताना अनेक शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. याची दखल घेऊन तात्पुरती दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.