लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : तालुक्यातील नांदखेडा येथे असलेले गावठी दारुचे अड्डे असल्याच्या चर्चेवरुन पोलिसांनी ५ मे रोजी गावठी दारू अड्डे उध्वस्त केले आहे. यामध्ये २२५ लिटर दारु फेकून देण्यात आली.सहायक पोलीस निरिक्षक आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील कोविड १९ प्रतिबंधक कमिटीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली होती. मिटिंगमध्ये कोरोना विषाणुचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्याकरिता करण्यात येणाº्या उपाययोजनानबाबत चर्चा करण्यात आली.चर्चेदरम्यान मोरे यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या असता गावातील इसम राजू चंद्रभान लटाळ व मोहन दगडू पवार हे शेजारील नदीच्या काठावर गावठी हातभट्टीची दारू निर्माण करून विक्री करीत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात आली . ताबडतोब सदर बाबीची दखल घेऊन पोलीस कर्मचारी अनिरुद्ध भगत, गोपाळ कव्हर , जितेंद्र ठाकरे, चालक घुगे यांच्या मदतीने छापा टाकून वरील दोन आरोपितांच्या ताब्यातील २३ हजार रुपये किंमतीची सुमारे २२५ लिटर गावठी दारू व मुद्देमाल जागीच नष्ट करुन आरोपिंवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला . सदर कारवाई पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मोरे, ंअनिरुद्ध भगत, गोपाळ कव्हर , जितेंद्र ठाकरे, चालक घुगे यांनी केली आहे.
-परिसरातील कोणत्याही गावात गावठी हाभट्टीची दारू विक्री होत असल्यास ताबडतोब पोलिसांना माहिती देउन सहकार्य करावे. तसेच ईतरही अवैध धंदयाबाबत नागरिकांनी माहिती दयावी.-आदिनाथ मोरेसहायक पोलीस निरिक्षिक