लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: स्थानिक नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 2 मध्ये ठिकिठकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचले आहेत. शाळेच्या आवारात साचलेल्या डबक्यातूनच चिमुकल्या विद्यार्थ्यांना येजा करावी लागते. या घाणपाण्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका आहे.शहरातील पोलीस स्टेशन परिसरातनगर परिषदेच्या शाळा क्रमांक 2 आणि 4 चे वर्ग भरविले जातात. या शाळांत शहरासह तालुक्यातील शेकङो विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी उच्चशिक्षित शिक्षकवर्ग नियुक्त आहे. ते सर्वजन इमानेइतबारे आपले कर्तव्य पार पाडतात. तथापि या शाळेत काहि ऊणिवाही आहेत. त्यामध्ये शाळेच्या आवाराच्या साफसफाईचा प्रामुख्याने ऊल्लेख करावा लागेल. शाळेच्या आवारात पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था न केल्याने आवारात ठिकठिकाणी गटार साचते. विद्यार्थी त्या गटाराच्या अवतीभवती फिरत वर्गात प्रवेश करतता. गटारामुळे जंतू संसर्ग होऊन साथीचै आजार बळावू शकतात. त्यामुळँ विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन पाण्याचे डबके बुजवणे आवश्यक आहे.