लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्राात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना वाशिम जिल्ह्यातही एकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले . ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्याबरोबर वाशिम शहरात ४ मार्च रोजी रस्त्यावर पोलीस कर्मचाºयाविना कोणीच आढळून आले नाही. सद्यस्थितीत रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट असून नागरिकांनी धास्ती घेतली आहे.जिल्हयात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्यावतिने घराबाहेर न निघता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. शहरामध्ये संचारबंदीतही काही नागरिक फिरतांना दिसून येत होते. परंतु शुक्रवारी कोरोनाचा रुग्ण जिल्हयात आढळल्याची माहिती कळताच रस्ते निर्मन्युष झालेले दिसून येत आहेत. प्रशासनाच्यावतिने अत्यावश्यक सेवेची वेळ सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत केली आहे.यावेळत दररोज नागरिकांची गर्दीने दुकाने फूलून जायचे परंतु शनिवारी तुरळक गर्दी दिसून आली. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणााºया नागरिकांवर पोलीस प्रशासनाच्यावतिने कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कामा व्यतिरिक्त शहरात फिरु नये असे आवाहन पोलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी केले आहे.पोलीस प्रशासनाच्यावतिने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून खुद्द पोलीस अधिक्षक दररोज शहरातून फेरफटका मारुन परिस्थितीची माहिती जाणून घेत आहेत.
भाजी बाजारातील गर्दीही ओसरलीकोरोना विषाणुच्या पार्श्वभूमिवर जिल्हयात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतरही नागरिकांचे शहरात फिरणे सुरुच होते.पोलीस प्रशासनाच्यावतिने कळकळीने विनंती करीत घराच्याबाहेर न पडण्याचे आवाहन केल्या गेल्यानंतरही या आवाहनाला नागरिकांकडून प्रतिसाद पाहिजे त्या प्रमाणात मिळत नव्हता. शुक्रवारी कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी भाजीबाजारातही गर्दी ओसरलेली दिसून आली. तसेच रस्त्यावरही शुकशुकाट दिसून आला.