शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत: केशरी शिधापत्रिकांना धान्य मे महिन्यापासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 5:15 PM

मेपासून योजनेचा लाभ देण्यात काय अर्थ, असा प्रश्न वंचित शिधापत्रिकाधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रणासाठी राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे आदेश असल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशात स्वस्तधान्य दुकानांतून मोफत धान्य अंत्योदय तथा प्राधान्य शेतकरी म्हणजे पिवळे कार्डधारकांना वितरीत करण्यात आहे. यात केशरी शिधापत्रिकाधारक वंचित असल्याने त्यांनाही धान्य देण्याचे आदेश निर्गमित केले; परंतु केशरी शिधापत्रिकांवर त्याचा लाभ मे महिन्यापासून मिळणार आहे. प्रत्यक्षात लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंतच असताना मेपासून योजनेचा लाभ देण्यात काय अर्थ, असा प्रश्न वंचित शिधापत्रिकाधारकांकडून उपस्थित केला जात आहे.राज्यशासनाने अंत्योदय आणि जिल्ह्यातील केशरी (एपीएल) शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांना ८ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने प्रतिव्यक्ती २ किलो तांदूळ दिला जाणार आहे. मे व जून महिन्यात या अन्नधान्याचे वितरण केले जाणार आहे. प्रत्यक्षात गेल्या २३ दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्यांवर उपासमारीची पाळी आली असताना शासनाने सर्वसामान्यांचा विचार करूनच स्वस्तधान्य वितरणाचा निर्णय घेणे अपेक्षीत होते. तथापि, तूर्तास ३० एप्रिलपर्यंतच लॉकडाऊनचे आदेश असताना केशरी शिधापत्रिकांना मे आणि जून महिन्यात धान्य पुरवठा करण्यात काय अर्थ, असा प्रश्न सर्वसामान्यांसह केशरी शिधापत्रिकाधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :washimवाशिम