शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

Lok Sabha Election 2019 : समाजातील गठ्ठा ‘वोटींग’साठी उमेदवारांची धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 2:02 PM

वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणूकीचा ज्वर आता चांगलाच वाढला असून आपापल्या समाजातील गठ्ठा ‘वोटिंग’ पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांनीही ‘चोटी का दम’ लावणे सुरू केले आहे.

- सुनील काकडे  वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणूकीचा ज्वर आता चांगलाच वाढला असून आपापल्या समाजातील गठ्ठा ‘वोटिंग’ पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांनीही ‘चोटी का दम’ लावणे सुरू केले आहे. त्यानुषंगाने ४१ ‘डिग्री सेल्सीयस’च्या कडक उन्हात मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढत मतदारांचे उंबरठे झिजवून मतांची खैरात मागितली जात असल्याचे दिसून येत आहे.मराठा समाजाच्या असलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी यांनी २००९ आणि त्यानंतर २०१४ मध्ये वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा विजयश्री मिळवत खासदारकीचा बहुमान पटकाविला. अर्थात दोन्हीवेळा पक्षातील स्थानिक पातळीवरील नेत्यांची भक्कम साथ आणि गवळी ज्या मराठा-कुणबी समाजाच्या आहेत, त्या समाजासोबतच बंजारा व अन्य समाजातील मतदारांचेही त्यांना पाठबळ मिळाले. त्यामुळेच भावना गवळी यांनी २००९ मध्ये काँग्रेसचे हरिसिंह राठोड यांचा ५६ हजार ९५१ मतांनी; तर २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचेच शिवाजीराव मोघे यांचा ९३ हजार ८१६ मतांनी पराभव केला. दोन्हीवेळा भावना गवळी यांना दमदार मताधिक्य मिळाले. असे असताना त्यांनी गेल्या १० वर्षाच्या प्रदिर्घ कारकिर्दीत मतदारसंघात खासदारकी उपभोगताना पदाला साजेशी कामगिरी केलेली नाही. त्यामुळेच यवतमाळातील चार विधानसभा मतदारसंघ आणि वाशिममधील दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासकामांचा आलेख कमालीचा खालावला आहे. त्यांच्याच मराठा-कुणबी समाजात बेरोजगारांची भली मोठी फौज तयार झालेली आहे. केवळ लग्नसोहळे आणि मरणधरणाच्या कार्यक्रमांना हजेरी लावून जमणार नाही; तर बदलत्या काळासोबत स्वत:तही बदल घडवून विकासकामांच्या जोरावर मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलावा लागणार, मतदारांच्या मुलभूत गरजा जाणून त्या पूर्ण करण्यासाठी काम करावे लागणार, याकडे भावना गवळी यांचे कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणूकीत त्यांच्यासमोर खडतर आव्हाने उभी ठाकली आहेत. त्याचा सामना त्या कशाप्रकारे करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.एकाच समाजाच्या दोन उमेदवारांमुळे तगडी ‘फाईट’!२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या कडव्या आव्हानांसमोर गारद झालेल्या काँग्रेसकडून यंदा वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीत उतरलेले माणिकराव ठाकरे हे देखील मराठा-कुणबी समाजाचेच असून त्यांनीही अन्य समाजातील मतदारांसोबतच दोन्ही जिल्ह्यांमधील मराठ्यांच्या गावांकडे प्रामुख्याने आपला मोर्चा सद्या वळविला आहे. खासदारकीच्या ‘हॅटट्रीक’वर असलेल्या भावना गवळींचा वारू रोखण्याचे मोठे आव्हान माणिकरावांना पेलावे लागणार आहे. त्यात ते कशापद्धतीने यशस्वी ठरतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या तथा एकाच समाजाच्या या दोन उमेदवारांमुळे मराठा समाजातील मतांचे विभाजन होणार असून तगडी ‘फाईट’ होईल, असा राजकीय तज्ज्ञांचा सूर आहे.बंजारा समाजाची निर्णायक मते कुणाकडे?भाजपात वलय निर्माण करूनही उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे बंजारा समाजाचे पी.बी. आडे यांनीही प्रामुख्याने आपल्या समाजातील ‘गठ्ठा’ मतांवर एकहाती ‘कब्जा’ मिळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न चालविले आहेत. अर्थात समाजातील प्रतिष्ठित मंडळी आडे यांच्या बाजूने असल्याने बंजारा समाजाची निर्णायक समजली जाणारी मते आडे शेवटपर्यंत अडवून ठेवतील, अशी खमंग चर्चा होत आहे.

टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक