लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जेवणाच्या नावाखाली चेकपोस्टवरुन दांडी मारणारे कर्मचाऱ्यांबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच कर्मचारी चेकपोस्टवर हजर झाले असल्याचे १७ व १८ जुलै रोजी दिसून आले.लोकमतने १७ जुलै रोजी ‘जेवणाच्या नावाखाली चेकपोस्टवरील पोलिसांची दांडी’ वृत्त प्रकाशित केले होते. याची पोलीस प्रशासनाच्यावतिने तातडीने खबरदारी घेवून गैरहजर कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. तसेच परजिल्हयातीलच नव्हे तर जिल्हयातीलही वाहन चेकपोस्टवरुन जात असल्यास त्याची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. त्यानुसार १७ व १८ जुलै रोजी कर्तव्यावर असलेले सर्वच पोलीस अधिकारी, कर्मचारी चेकपोस्टवर आढळून आलेत. विशेष म्हणजे यावेळी चेकपोस्ट ओलांडून किती वाहने गेलीत, कुठे गेलीत याचीमाहिती घेवून त्यांच्या वाहनाचे क्रमांकाची नोंद कर्मचाºयांनी घेतली. यावेळी पोलीस उपनिरिक्षक मोहोड, पोलीस कर्मचारी राठोड यांनी प्रत्येक वाहनांची तपासणी केली. तसेच चेकपोस्टवरुन जाणाºया मोटारसायकस्वारांची विचारपूस करण्यात आली.
शेलुबाजार रस्त्यावरील चेक पोस्टपरजिल्हयातील कोणतेच वाहन शहरात येवू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हयात जिल्हयाच्या सिमेवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर कोणत्याच वाहनांची तपासणी केल्या जात नसल्याच्या माहितीवरुन लोकमतच्यावतिने १५ व १६ जुलै रोजी स्टिंग आॅपरेशन केले होते. शेलुबाजार रस्त्यावरील चेक पोस्टवर एकच कर्मचारी हजर होतो. त्यांनी एकाही वाहनांची तपासणी केल्याचे दिसून आले नाही.