लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : अकोला आगाराची अकोला ते परभणी ही बसफेरी शिरपूर जैन येथील बस स्थानक परिसरात न आणताच गावाबाहेरूनच वळविण्यात येत होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने ७ डिसेंबरला वृत्त प्रकाशित केल्यानंतर ९ डिसेंबरला सदर बसफेरी शिरपूर बसस्थानकात आली.२० वषार्पेक्षा अधिक काळापासून अकोला आगाराची अकोला ते परभणी ही बसफेरी शिरपूर , रिसोड मार्गे सुरू आहे. सदर बसफेरी मागील काही दिवसांपासून शिरपूर बस स्थानकावर न आणता गावाबाहेरूनच नेली जात होती. याप्रमाणेच जिंतूर ते अकोला बस फेरीसुद्धा काही दिवसांपासून गावाबाहेरून वळविण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने ७ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत सदर दोन्ही बसफेºया शिरपूर बसस्थानकात नेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार ९ डिसेंबर रोजी अकोला ते परभणी आणि जिंतूर ते अकोला या दोन्ही बसफेºया शिरपूर बसस्थानकात आल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळली असून, यापुढेही नियमितपणे सदर बसफेºया गावाबाहेरून न नेता शिरपूर बसस्थानकमार्गे नेण्यात याव्या, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
लोकमतची दखल : अकोला ते परभणी बसफेरी शिरपूर बसस्थानकात आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 4:47 PM